विद्यापीठात संघाचा प्रचार, महसूलमंत्र्यांनी केली चौकशीची मागणी

891

भाजपच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घुसखोरी केली आहे. संघाचे स्वयंसेवक विद्यापीठात निर्धारित शिक्षण देण्याऐवजी विद्यार्थ्यांना संघाचे स्वयंसेवक होण्यासाठी प्रचार करीत असल्याचा आरोप काँग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. हा प्रकार गंभीर असून या प्रकरणाची चौकशीची मागणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या घुसघोरीला बाळासाहेब थोरात यांनी भाजपला जबाबदार धरले आहे. भाजप सरकारच्या आशीर्वादानेच शिक्षण क्षेत्रात संघाच्या स्वयंसेवकांनी घुसखोरी केल्याचे ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. संघाचे स्वयंसेवक विद्यापीठांमध्ये शिक्षण देण्याऐवजी संघाचा प्रचार व प्रसार करीत आहेत. संघाचा स्वयंसेवक होण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत, असा आरोप करतानाच महाराष्ट्र विकास आघाडी सरकार असले प्रकार खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यासंदर्भात आपण उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली आहे. विद्यापीठात संघाचा प्रचार व प्रसार हा गंभीर प्रकार आहे. याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी आपण मागणी केल्याचे थोरात यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या