संकट काळात मदतीसाठी आरटीओचा पुढाकार, सीएम फंडसाठी हातभार लावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात पसरणारी कोरोना महामारी आणि त्यानंतर करण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे महाराष्ट्राचे बंद पडलेले महसूल या पार्श्वभूमीवर आरटीओ म्हणजेच मोटर वाहन विभागाच्या कार्यकारी अधिकारी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने एकूण तीन दिवसाच्या पगाराची रक्कम मुख्यमंत्र मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने एक पत्रक जारी करण्यात आले असून जवळपास एक कोटी रुपयांची रुपयांचा मदतनिधी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करण्याचा निश्चिय केला आहे. आरटीओच्या कार्यकारी अधिकारी संघटनेचे सचिव विजय इंगवले यांनी ही माहिती दिली.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या शहराने आणि महाराष्ट्र राज्याने अनेकांचे रक्षण केले आहे. कुणाची उपासमार होऊ दिली नाही. ज्या शासनाने आजवर मायेचे छत्र दिले, हक्काची भाकरी दिली ते शासन अडचणीत असताना राज्याचा स्वाभिमान जपण्यासाठी शक्य तितकी मदत करण्याचा आरटीओच्या संघटनेचा प्रयत्न आहे. तीन दिवसाच्या पगाराखेरीज अन्य कोणाला काही मदत करायची असल्यास तसे करता येईल, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान या आवाहनानंतर संघटनेने 13 एप्रिल 2020 च्या सायंकाळ पर्यंत 15 लाख 76 हजार 188 रुपये इतकी रक्कम जमा केला होता. ऑनलाइन प्रक्रियेद्वारे ही मदत करता येणार आहे, असेही सांगण्यात आले. जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.