
अमेरिकेच्या 25 टक्के अतिरिक्त टॅरिफमुळे बाजारात तणाव असल्याने आज रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत तब्बल 64 पैशांच्या सार्वकालिन निचांकी पातळीवर घसरून 88.19 वर स्थिरावला. हिंदुस्थान अमेरिकेतील व्यापार करारावरील अनिश्चिततेचा परिणामही रुपयावर झाल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत.