अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर,पहिली गुणवत्ता यादी ५ जुलैला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले असून १३ ते २५ जूनपर्यंत ऑनलाइन अर्जाचा भाग २ भरता येणार आहे. तसेच यंदा प्रथमच बायफोकल अभ्यासक्रमाचे प्रवेशही ऑनलाइन होणार असून या अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी २१ जूनला सकाळी ११ वाजता तर आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स शाखेची पहिली यादी ५ जुलैला जाहीर होणार आहे.

शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सोमवारी रात्री अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार १३ ते १८ जून या कालावधीत बायफोकलसह अन्य शाखांचे पसंतीक्रम भरणे सुरू राहणार असून याचदरम्यान इनहाऊस, अल्पसंख्याक आणि मॅनेजमेंट कोटय़ातील प्रवेश कॉलेज स्तरावर होणार आहेत. कोटय़ातून झालेले प्रवेश ऑनलाइन प्रवेशाच्या वेबसाइटवर अपलोड करणे कॉलेजला बंधनकारक आहे. याचदरम्यान शून्य प्रवेशफेरीदेखील होणार असून कोटय़ातील प्रवेश प्रक्रिया २५ जूनपर्यंतच सुरू राहणार आहे.

ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक बायफोकल

  • पहिली गुणवत्ता यादी – २१ जून, सकाळी ११ वा.
  • पहिल्या यादीतील प्रवेश – २१ व २२ जून, सकाळी ११ ते सायं. ५
  • दुसऱया फेरीसाठी जागा जाहीर – २३ जून, सकाळी ११ वा.
  • दुसऱया यादीसाठी पसंतीप्रमाणे – २३ ते २५ जून,(सकाळी ११ ते सायं. ५)
  • सर्व शाखांचे अर्ज भरणे बंद – २५ जून
  • दुसरी गुणवत्ता यादी – २८ जून, सकाळी ११ वा.
  • दुसऱया यादीनुसार प्रवेश – २८ ते २९ जून
  • सर्वसाधारण गुणवत्ता यादी – २९ जून, सायं. ५ वा.
  • हरकती देणे – ३० जून ते २ जुलै
  • हरकतीचे निवारण – ३ जुलै

अकरावी प्रवेश प्रक्रियेदरम्यान सुमारे ७० टक्के प्रवेश पूर्ण झाल्यास कॉलेज सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे.
उशिराने प्रवेश होणाऱया विद्यार्थ्यांचा बुडालेला अभ्यासक्रम भरून काढण्यासाठी जादा तासिका घेण्यात येणार आहेत.
आर्टस् , कॉमर्स, सायन्स शाखांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना जर बायफोकल शाखेत प्रवेश हवा असल्यास रिक्त जागांनुसार व गुणवत्ता ग्राहय़ धरून प्रवेश देण्यात येणार आहेत.

आर्टस् , कॉमर्स, सायन्स

  • पहिली गुणवत्ता यादी – ५ जुलै, सकाळी ११ वा.
  • पहिल्या यादीतील प्रवेश – ६ ते ९ जुलै (सकाळी ११ ते सायं. ५)
  • रिक्त जागांचा तपशील – १० जुलै, सकाळी ११
  • पसंतीक्रम भरणे – १० ते ११ जुलै (सकाळी ११ ते सायं. ५)
  • दुसरी गुणवत्ता यादी – १३ जुलै, दुपारी ४ वा.
  • तिसरी गुणवत्ता यादी – २३ जुलै, सकाळी ११ वा.
  • तिसऱया यादीतील प्रवेश – २४ व २५ जुलै
  • चौथी गुणवत्ता यादी – २९ जुलै, सकाळी ११
  • चौथ्या यादीनुसार प्रवेश – ३०, ३१ जुलै सकाळी ११ ते सांय. ५.