
काळय़ा समुद्रात मोस्कवा ही युद्धनौका बुडाल्याने रशिया खवळला आहे. या युद्धनौकेवर क्षेपणास्त्र्ा डागल्याचा दावा युव्रेनने केल्यानंतर रशिया आक्रमक झाला असून रशियाच्या अधिकृत सरकारी टीव्ही चॅनेलवरून ‘आता तिसरे जागतिक युद्ध सुरू झाले आहे’ अशी घोषणाच करण्यात आली आहे.
रशियाने युव्रेनवर हल्ला केल्यानंतर गेल्या 51 दिवसांपासून दोन्ही देशांत युद्ध भडकलं आहे. युद्धविरामाची तूर्त सूतराम शक्यता नसून स्थिती आणखीच चिघळत चालली आहे. त्यात रशियाची मोस्कवा ही युद्धनौका काळय़ा समुद्रात बुडाल्याने रशियाचा संताप झाला आहे. या युद्धनौकेवर आम्ही हल्ला केल्याचा दावा युव्रेनने केला आहे. ओडेसा किनाऱयाजवळ दोनवेळा या युद्धनौकेवर क्षेपणास्त्र्ाs डागण्यात आली. त्यानंतर मोठा स्पह्ट झाल्याचे युव्रेनच्या अधिकाऱयांचे म्हणणे आहे. या दाव्यानंतर रशियाच्या ‘रशिया 1’ या सरकारी टीव्ही चॅनेलवरून तिसरे महायुद्ध सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.




























































