
रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये एका महिलेने स्पर्म बँकेद्वारे 6 फूट उंचीच्या एक व्यतींकडून शुक्राणू (स्पर्म ) घेतेले होते. आपल्या पोटी जन्म घेणाऱ्या बाळाची उंची अधिक असावी म्हणून तिने या व्यक्तीकडून शुक्राणू घेतले होते. या महिलेचे वय 40 वर्ष असून तिच्यावर आयव्हीएफद्वारे ट्रीटमेंट केली गेली. मात्र महिलेच्या पोटी जन्मलेले बाळ हे कमी उंचीचे जन्माला आले आहे.
गरोदरपणानंतर डॉक्टरांनी महिलेची आणि बाळाची तपासणी केली. बाळाच्या जन्मापूर्वीच डॉक्टरांनी तिला ‘एकोन्ड्रोप्लासिया’ असल्याचे सांगितले होते. यात बाळाची हाडे विकसित होत नाहीत. म्हणजेच त्याच्या हाडे अगदी मंद गतीने वाढतात.
4 फूटांपेक्षा जास्त उंची वाढणार नाही
प्रसूतीनंतर डॉक्टरांनी या महिलेला सांगितले आहे की, या आजारामुळे बाळाची उंची 4 फूटांपेक्षा जास्त वाढणार नाही. महिलेने या स्पर्म बँकेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणी स्पर्म बँकेचे म्हणणे आहे की, त्यांनी त्याच कॉलीटीचा स्पर्म दिला होता, जो महिलेने मागितला होता. मात्र असे बोलले जात आहे की, हा आजार स्पर्ममुळे झाला नसून हा आजार अनुवांशिक आहे.
























































