#SAvENG इयान मॉर्गनची तुफानी खेळी, टी-20 क्रिकेटमध्ये पडला धावांचा पाऊस

1473

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या अखेरच्या टी-20 लढतीमध्ये अक्षरश: धावांचा पाऊस पडला. सेंच्यूरियन पार्क मैदानावर खेळल्या गेलेल्या या लढतीत दोन्ही संघांनी मिळून तब्बल 448 धावा फटकावल्या. अखेरच्या षटकामध्ये निर्णायक फटकेबाजी करत इंग्लंडना हा सामना आणि मालिकाही आपल्या नावावर केली.

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडच्या गोलंदाजांची तुफान धुलाई केली. हेन्रीच क्लासेन 66, बवुमा 49, मिलर आणि डीक कॉक प्रत्येकी 35 यांच्या सांघिक खेळीच्या बळावर आफ्रिकेने 20 षटकात 6 बाद 222 धावा केल्या. आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 223 धावांचे आव्हान इंग्लंडने 19.1 षटकांमध्ये पाच विकेट गमावत पूर्ण केले.

इंग्लंडकडून कर्णधार इयान मॉर्गन याने 22 चेंडूंमध्ये 57 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने एकही चौकार लगावला नाही, मात्र 7 षटकार जरूर ठोकले. यासह जोस बटलरने 29 चेंडूत 57 आणि जॉनी बेअरस्टोने 34 चेंडूत 64 धावांची खेळी केली.

जलद अर्धशतकाचा विक्रम
आफ्रिकेविरुद्ध तुफानी अर्धशतक ठोकताच मॉर्गनच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली. टी-20 क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला. रविवारी झालेल्या लढतीत त्याने अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत आपल्याच विक्रमाची बरोबरी केली. 2019 ला नेपियार येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळताना मॉर्गनने 21 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.

आपली प्रतिक्रिया द्या