
केंद्र, राज्य आणि महापालिका-नगरपालिकांपर्यंत एकाच पक्षाची, म्हणजे भाजपचीच सत्ता द्या. त्यामुळे राज्यांचा-शहरांचा वेगवान आणि सर्वांगीण विकास होईल, अशी पोपटपंची भाजपवाले नेहमीच करीत असतात. आताही महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीच्या प्रचारात ते ती टिमकी वाजवीतच आहेत, पण मग इंदूर आणि गांधीनगरमध्ये वरपासून खालपर्यंत वर्षानुवर्षे तुमचीच सत्ता असूनही साधे पिण्याचे स्वच्छ पाणी तुम्ही नागरिकांना का देऊ शकला नाहीत? इंदूरमध्ये 17 बळी का रोखू शकला नाहीत? तुमच्या ‘स्वच्छ’ कारभाराची दातखीळ का बसली? कारण हे बळी दूषित पाण्याचे नव्हे, तर तुमच्या ‘दूषित’ कारभाराचे बळी आहेत.
महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. सत्ताधारी भाजप आश्वासनांचे रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडत आहे, परंतु इंदूर आणि गुजरातमधील गांधीनगर येथील भयंकर घटनांनी या फुग्यांना टाचणी लावली आहे. इंदूर येथील दूषित पाण्याचा कहर मागील सहा-सात दिवसांपासून थांबायला तयार नाही. त्यात गुजरातमधील गांधीनगरमध्येही दूषित पाण्यामुळे शंभरपेक्षा जास्त मुले आजारी पडल्याचे समोर आले आहे. गांधीनगरमध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नसली तरी इंदूरमधील दूषित पाण्याच्या बळींची संख्या 17 वर गेली आहे. या दोन्ही राज्यांत आणि महापालिकांमध्ये भाजपचीच सत्ता आहे. गुजरात हे तर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचेच गृहराज्य आहे. मोदींच्या ‘गुजरात मॉडेल’च्या पिपाण्या भाजपवाले आणि अंधभक्त वर्षानुवर्षे वाजवत आहेत. इंदूर शहराच्या विकास व्यवस्थापनाचे नगारेदेखील ही मंडळी नेहमी वाजवत असतात. तरीही दूषित पाण्याने तिथे 17 बळी घेतले. शिवाय शेकडो लोक रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. सुमारे दोन हजार रहिवाशांना या दूषित पाण्याची बाधा झाली आहे. इंदूर शहराचा ‘स्वच्छ शहर’ म्हणून आणि तेथील भाजपच्या प्रशासकीय कार
दुर्लक्ष केले
गेले. ज्या भगीरथपुरा भागात या विषारी पाण्याचा सर्वाधिक अनर्थ घडला तेथे दूषित पाण्याच्या तक्रारींवरून नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी निविदाही काढण्यात आली. तथापि, ती निविदा लालफितीत अडकली. महापालिका प्रशासनाने ना पाईप बदलले ना जुन्या जलवाहिन्यांची दुरुस्ती केली. सत्ताधाऱ् यांचा हाच निष्काळजीपणा शहरातील 17 निरपराध्यांच्या जिवावर बेतला. नागरिकांना स्वच्छ पाणी देणे हे कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्ताधाऱ्यांचे किमान प्राथमिक कर्तव्य असते. इंदूरमध्ये भाजपवाल्यांनी या प्राथमिक कर्तव्याला तर खुंटीवर टांगून ठेवलेच, शिवाय सामान्य इंदूरकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाही प्रकार केला. भाजपचे ज्येष्ठ नेते, स्थानिक आमदार आणि राज्याचे नगरविकास मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी इंदूरकरांची माफी मागण्याऐवजी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ‘‘फोकट का सवाल पुछते हो’’ असे उर्मट उत्तर दिले. काही अपशब्दही वापरले. पुढे त्यांनी माफी वगैरे मागितली, परंतु भाजपचा खरा चेहरा उघडा पडायचा तो पडलाच. मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनीही या घटनेवरून ‘‘मध्य प्रदेश सरकारने या पापाचे प्रायश्चित्त घ्यावे,’’ अशा शब्दांत स्वपक्षाला घरचा आहेर दिला आहे. आता 17
निरपराध्यांचा मृत्यू झाल्यावर
जाग आलेल्या सत्ताधाऱ्यांनी पाण्याचे नमुने, त्यांची तपासणी आणि इतर उपाय करण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यामुळे हकनाक गेलेले जीव परत येणार आहेत का? तुमची गेलेली अब्रू परत मिळणार आहे का? मध्य प्रदेश प्रदूषण नियंत्रण बोर्डाने इंदूरच नव्हे तर राज्यातील अनेक ठिकाणचे पिण्याचे पाणी दूषित, पिण्यासाठी घातक असल्याचा अहवाल दहा वर्षांपूर्वीच राज्य सरकारकडे दिला होता. मात्र भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी तो बासनात गुंडाळून ठेवला. या अहवालानुसार वेळीच कार्यवाही केली असती तर इंदूरमध्ये दूषित पाण्याचे जे बळी गेले ते वाचले असते. केंद्र, राज्य आणि महापालिका-नगरपालिकांपर्यंत एकाच पक्षाची, म्हणजे भाजपचीच सत्ता द्या. त्यामुळे राज्यांचा-शहरांचा वेगवान आणि सर्वांगीण विकास होईल, अशी पोपटपंची भाजपवाले नेहमीच करीत असतात. आताही महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीच्या प्रचारात ते ती टिमकी वाजवीतच आहेत, पण मग इंदूर आणि गांधीनगरमध्ये वरपासून खालपर्यंत वर्षानुवर्षे तुमचीच सत्ता असूनही साधे पिण्याचे स्वच्छ पाणी तुम्ही नागरिकांना का देऊ शकला नाहीत? इंदूरमध्ये 17 बळी का रोखू शकला नाहीत? तुमच्या ‘स्वच्छ’ कारभाराची दातखीळ का बसली? कारण हे बळी दूषित पाण्याचे नव्हे, तर तुमच्या ‘दूषित’ कारभाराचे बळी आहेत.

































































