सामना अग्रलेख- राम रहीमची पिकनिक (भाजप पुरस्कृत)

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राम रहीमला हरयाणा सरकारने 21 दिवस सुट्टीची रक्षाबंधन भेट दिली, पण इतरही कैद्यांना बहिणी आहेत. राम रहीम हा भाजपचा सरकारी भाऊलागतो काय? कॅ. अशोक खरात, राम रहीम, आसाराम बापू अशा अनेक वादग्रस्त बाबा मंडळींशी एकाच वेळी भाजपचे नाते असणे हा योगायोग नसून ही विकृती म्हणजेच त्यांचे हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आहे. बलात्काराच्या प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या राम रहीमला विशेष सवलती देऊन भाजप त्याच्या शिष्यगणांचे समर्थन मिळवत असेल तर तो भारतीय नारी शक्तीचा अपमान आहे. राम रहीमचे फोटो भाजपने आपल्या मुख्यालयात लावून पूजा करावी, त्याच्या आरत्याधुपारत्या कराव्यात हा त्यांचा प्रश्न, पण एका बलात्काऱ्यास प्रतिष्ठा देऊन भाजपने सुरू केलेला उदो उदोनिषेधार्ह आहे. भाजप पुरस्कृत राम रहीमची पिकनिकम्हणजे भाजपचे खरे चारित्र्यच आहे.

 योध्येतील श्रीराम मंदिरावर दरोडे टाकण्याचे धार्मिक कार्य पूर्ण झाल्यावर भाजपने रोहतकच्या राम रहीम बाबाची भगतगिरी सुरू केलेली दिसते. श्रीरामांनी 14 वर्षे वनवास भोगला व पुन्हा ते अयोध्येत परतले. रोहतकच्या राम रहीमला भारतीय न्यायालयाने 20 वर्षांचा तुरुंगवास दोन शिष्यांच्या बलात्कार प्रकरणात ठोठावला आहे. बलात्कार प्रकरणातला हा तुरुंगवास म्हणजे राम रहीम बाबाच्या नशिबी आलेला वनवास आहे. त्यामुळे भाजपचे मंत्री अधूनमधून राम रहीमला हवापालटासाठी तुरुंगाबाहेर घेऊन येतात व ताजेतवाने करून पुन्हा तुरुंगात पाठवतात. आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने राम रहीमला तुरुंग प्रशासनाने 21 दिवसांची सुट्टी दिली आहे. ‘फर्लो’ नियमानुसार राम रहीमला ही सुट्टी मिळाली. कधी पॅरोल, तर कधी फर्लोची मुभा घेत राम रहीम तुरुंगाबाहेर येतो. आपल्या भक्तांना आशीर्वाद देतो. त्यात भाजपचेच लोक मोठय़ा प्रमाणावर असतात. राम रहीम बाबाने बाहेर यावे यासाठी भाजपचे लोक प्रयत्नशील असतात. एका बाजूला महिला आरक्षण, महिला सबलीकरण, नारी शक्ती वंदना अशा कायद्यांवर बोलायचे. विरोधी पक्ष नारी शक्तीविरोधी आहे असा भ्रम निर्माण करायचा. त्याच वेळी राम रहीमसारख्या बलात्कारी बाबाचे समर्थन करायचे. आपल्याच दोन शिष्यांच्या बलात्कार प्रकरणात राम रहीमला न्यायालयाने 20 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. मंगळवारी सकाळीच

रोहतकच्या तुरुंगातून

राम रहीम बाबा बाहेर पडला तेव्हा त्याच्या काफिल्यात 15 आलिशान गाड्या होत्या व त्याची जणू विजयी मिरवणूक निघाली. हे चित्र समाज आणि कायदा यांसाठी अशोभनीय आहेच, परंतु त्याहीपेक्षा भाजपसाठी निर्लज्जपणाचे कृत्य आहे. केंद्रात भाजपचे गृहमंत्री आहेत तसे हरयाणात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे गृहखात्याच्या संमतीशिवाय राम रहीम बाबा बाहेर येऊ शकत नाही. 28 ऑगस्ट 2017 पासून बाबा राम रहीम शिक्षा भोगत आहे व आतापर्यंत 17 वेळा तुरुंगातून विविध कारणांनी बाहेर आला. 458 दिवस हे बाबाजी भाजपपृपेने बाहेर राहिले. या वर्षीच्याच जानेवारी महिन्यात बाबाला 40 दिवस आणि मे महिन्यात 30 दिवसांची ‘पॅरोल’ रजा मंजूर झाली होती. मंगळवारी तुरुंगाबाहेर पडताच तो सिरसा येथील त्याच्या आलिशान आश्रमात पोहोचला व मंचावर जाऊन ‘सत्संग’ केला. अकाली दलाचे जत्थेदार ग्यानी कुलदीपसिंग गर्गज यांनी म्हटले आहे, ‘‘बलात्कारासारख्या गुह्याची शिक्षा भोगणाऱया लोकांना पुनः पुन्हा जणू ‘पिकनिक’साठीच बाहेर सोडले जाते.’’ ग्यानी कुलदीपसिंग यांचे म्हणणे खरे आहे. राम रहीमसारख्या गुन्हेगारांना सरकारी कृपेने जी विशेष सवलत मिळत आहे, तसा

‘फर्लो-पॅरोल’चा लाभ इतर पैद्यांना का मिळू नये? दिल्ली दंगलीतले आरोपी (भाजप म्हणते) महिनोन्महिने तुरुंगात आहेत. त्यांना जामीनही मिळत नाही किंवा मिळू दिला जात नाही, पण बलात्कारातले आरोपी मात्र त्यांना

हवे तेव्हा बाहेर येऊन

पिकनिक करतात. हाच काय तुमचा कायदा आणि न्याय व्यवस्था? शिक्षा पूर्ण भोगलेले असंख्य पैदी देशभरातील अनेक तुरुंगांत खितपत पडले आहेत. अनेक कैद्यांना वकील देता येत नाहीत. त्यांच्या अवस्थेकडे कोणी पाहत नाही. जिल्हा कोर्ट, हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात लाखो खटले प्रलंबित आहेत, पण राम रहीमसारख्यांच्या ‘सुट्टी’चा अर्ज तत्काळ मंजूर करून बाहेर काढला जातो. कायदा हा सगळ्यांसाठी सारखाच असायला हवा हे इथे झालेले दिसत नाही. राम रहीमला हरयाणा सरकारने 21 दिवस सुट्टीची रक्षाबंधन भेट दिली, पण इतरही पैद्यांना बहिणी आहेत. राम रहीम हा भाजपचा ‘सरकारी भाऊ’ लागतो काय?

कॅ. अशोक खरात, राम रहीम, आसाराम बापू अशा अनेक वादग्रस्त बाबा मंडळींशी एकाच वेळी भाजपचे नाते असणे हा योगायोग नसून ही विकृती म्हणजेच त्यांचे हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आहे. बलात्काराच्या प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या राम रहीमला विशेष सवलती देऊन भाजप त्याच्या शिष्यगणांचे समर्थन मिळवत असेल तर तो भारतीय नारी शक्तीचा अपमान आहे. राम रहीमचे फोटो भाजपने आपल्या मुख्यालयात लावून पूजा करावी, त्याच्या आरत्या-धुपारत्या कराव्यात हा त्यांचा प्रश्न, पण एका बलात्काऱ्यास प्रतिष्ठा देऊन भाजपने सुरू केलेला ‘उदो उदो’ निषेधार्ह आहे. भाजप पुरस्पृत राम रहीमची ‘पिकनिक’ म्हणजे भाजपचे खरे चारित्र्यच आहे.