
घाटकोपर-पूर्वेकडील पटेल चौकाजवळील रस्त्याची दुरवस्था झाल्याचे वृत्त दै. ‘सामना’ने प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनाने तातडीने रस्त्याचे काँक्रिटीकरण केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर झाली असून प्रशासनाकडे पाठपुरावा करणारे शिवसेनेचे घाटकोपर पूर्व विधानसभा कार्यालयप्रमुख प्रकाश वाणी आणि दै. ‘सामना’चे नागरिकांकडून आभार मानले जात आहे.
आर. बी. मेहता मार्गावरील धनजी देवशी शाळा परिसरातील रस्त्याचे काम दोन महिन्यांपासून अपूर्णावस्थेत पडले होते. शाळेजवळील रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत होते. या समस्येवर दै. ‘सामना’मधून आवाज उठवण्यात आल्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने रस्त्याचे काँक्रिटीकरण केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
.

























































