
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दैनिक ‘सामना’च्या प्रभादेवी येथील कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘प्रबोधन प्रकाशन’ आयोजित ‘प्रबोधन गोरेगाव’ संचालित या रक्तदान शिबिरात ‘सामना’च्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईसह राज्यभरात अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर ‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ असल्याने ‘सामना’ कार्यालयातही शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान शिबिराचा शुभारंभ झाला. यावेळी प्रबोधन प्रकाशन प्रा.लि.चे संचालक विवेक कदम हेदेखील उपस्थित होते.
रक्तदात्यांचा गौरव
दुपारी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत चाललेल्या शिबिरात ‘सामना’च्या अनेक कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.



























































