
सामना ऑनलाईन, मुंबई
श्रावण महोत्सव 2019 या भव्य पाककला स्पर्धेला 1 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. एकूण 11 केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार आहे. स्पर्धा महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांसाठी असून त्यासाठी जोरात नावनोंदणी सुरू आहे. सर्वच केंद्रांवर स्पर्धकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे.
उत्तरा मोने यांच्या मिती क्रिएशन्स या संस्थेतर्फे ही पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दैनिक ‘सामना’ स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहेत. विविध प्रकारचे पराठे किंवा थेपले (गोड किंवा तिखट) असा या वर्षीच्या प्राथमिक फेरीचा विषय आहे. प्राथमिक फेरीचे मुख्य परीक्षक शेफ तुषार प्रीती देशमुख आणि न्युट्रीशनिस्ट नमिता नानल आहेत. त्याचबरोबर एक परीक्षकांचे पॅनेलही प्राथमिक फेरीचे परीक्षण करेल. पॅनलमध्ये पितांबरीतर्फे शिवानी नेमावरकर, तन्वी हर्बल्सतर्फे डॉ. मानसी आणि डॉ. रुचा, माधवबाग आणि पूर्णब्रह्मतर्फे अधिकारी स्मिता सरजोशी, कला जोशी, शुभांगी देवचकेस स्वाती जोशी, श्रीया जोशी या मान्यवरांचा समावेश असेल. अंतिम फेरीचे मुख्य परीक्षक डॉ. विठ्ठल कामत असतील.
ठाणे येथे होणारी प्राथमिक फेरी खासदार राजन विचारे यांच्या विशेष उपस्थितीत आणि सहकार्याने होणार आहे. दक्षिण मुंबई/ मलबार हिल येथील स्पर्धा स्वामी सिद्धी प्रतिष्ठान आणि शिवसेना दक्षिण मुंबई महिला आघाडी यांच्या सहकार्याने होणार आहे. स्पर्धेला अरविंद बने, पांडुरंग सकपाळ, जयश्री बाळ्ळीकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. बदलापूर येथे होणारी फेरी संभाजी शिंदे यांच्या सहकार्याने होईल.
भरघोस बक्षिसांची लयलूट
प्रत्येक केंद्रावरून निवडून आलेल्या स्पर्धकांना बक्षीस म्हणून तसेच उपस्थित स्पर्धकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून पितांबरी, तन्वी हर्बल्स, व्हॉयला फॅशन ज्वेलरी, एन. के. जी. एस. बी. बँक, विको, आस्वाद, फॅमिली स्टोअर, पूर्णब्रह्म, सरोज स्वीट्स या दर्जेदार ब्रॅडतर्फे गिफ्ट हॅम्पर्स, माधवबागतर्फे फ्री कुपन्स, एस्सेल वर्ल्डचे फ्री पासेस अशी अनेक बक्षिसे मिळणार आहेत. श्रावण महोत्सवाच्या महाअंतिम सोहळय़ात पूर्णब्रह्मच्या जयंती कथाले थेट प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. तसेच पूर्णब्रह्मच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराची संधीदेखील उपलब्ध करून देणार आहेत. अंतिम फेरीतील विजेत्याला केसरीतर्फे मोफत आंतरराष्ट्रीय टुर करता येईल.
1 ऑगस्टपासून सुरू होणाऱया स्पर्धेच्या पहिल्या तीन सेंटरची माहिती
1 ऑगस्ट ठाणे नंदिनी विचारे ज्ञानराज सभागृह,
1 वाजता 9819995751 पाचपाखाडी, ठाणे (प.).
2 ऑगस्ट ताडदेव संध्या डुंबरे 9987658646 रुसी मेहता हॉल, जनता केंद्र,
3 वाजता (द. मुंबई) लता पाटील 9152447269 ताडदेव मुंबई.
4 ऑगस्ट बदलापूर संभाजी शिंदे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हॉल,
4 वाजता 9881070303 कात्रप, बदलापूर (पूर्व).
याव्यतिरिक्त ही स्पर्धा डोंबिवली, गोरेगाव, वसई, खारघर, चेंबूर, दहिसर, विलेपार्ले आणि दादर या ठिकाणी होणार आहे. या केंद्रांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नावनोंदणीसाठी 9930115759 या क्रमांकावर संपर्क साधावा.


























































