दैनिक ‘सामना’चे वार्ताहर – उपसंपादक भालचंद्र मगदूम यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दैनिक ‘सामना’चे वार्ताहर – उपसंपादक भालचंद्र पुंडलिक मगदूम (वय 48) यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, चार विवाहित बहिणी असा परिवार आहे.

दैनिक ‘सामना’च्या पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयात 15 वर्षांपासून भालचंद्र मगदूम कार्यरत होते. लेखक, कवी म्हणूनही ते ओळखले जात. कोल्हापूर जिह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील बेळगुंदी या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.