
हिंदुस्थानात साडय़ांची मोठी परंपरा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या साडय़ा नेसल्या जातात. दक्षिणेकडील कांजीवरम आणि सिल्क साडी प्रसिद्ध आहे. या साडय़ांना जगभरात मागणी आहे. या साडय़ा तयार करताना स्थानिक कारागीरांचे हस्तकौशल्य बघून थक्क व्हायला होतं. अशाच एका कारागीराने करामत केली आहे. त्याने एका माचीसच्या बॉक्समध्ये बसू शकेल, अशी साडी विणली आहे. हैदराबादच्या सिरसिल्ला जिह्यातील नल्ला विजय यांनी ही साडी बनवली आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने साडीची मागणी वाढली आहे.
नल्ला विजय यांनी शुद्ध रेशमाची असून अत्यंत बारीक कातल्यामुळे माचीसमध्ये बसू शकते. तेलंगणाचे नगरपालिका प्रशासन आणि नगरविकास मंत्री केटी रामाराव यांच्या ट्विटर हॅण्डलवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ही पोस्ट लोकांना खूप आवडत आहे. नेटकरी विणकर नल्ला विजय यांच्या प्रतिभेचे कौतुक करत आहेत.




























































