Photo – ‘सॅम बहादूर’ चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला सचिन तेंडुलकरची हजेरी, विक्की कौशलची प्रशंसा करत म्हणाला…

सौ. सोशल मीडिया

‘सॅम बहादूर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात विक्की कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. ‘सॅम बहादूर’ने दुसऱ्या दिवशी 9.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. नेटकरी सॅम माणेकशॉच्या भूमिकेसाठी त्याच्या कामाचे कौतुक करत आहेत. सॅम माणेकशॉच्या भूमिकेत विक्की कौशलच्या भूमिकेने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

दरम्यान हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक सिनेस्टार तसेच क्रिकेटर्सही उपस्थिती लावत आहे. या दरम्यानचे त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. शनिवारी संध्याकाळी क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरने ‘सॅम बहादूर’च्या विशेष स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. तेंडुलकरसोबत त्याची पत्नी अंजली तेंडुलकरही होत्या. स्क्रिनिंगमध्येही तो विक्कीसोबत फोटो काढताना दिसला होता.

स्क्रिनिंगनंतर या चित्रपटाची आणि विक्की कौशलच्या अभिनयाची सचिनने सर्वत्र प्रशंसा केली. तो म्हणाला, “हा एक अतिशय चांगला चित्रपट आहे. विक्कीच्या अभिनयाने मी खूप प्रभावित झालो. हिंदुस्थानचे माजी लष्कर प्रमुख सॅम माणेकशॉ उपस्थित असल्यासारखे वाटले. सर्व पिढ्यांसाठी पाहण्यासारखा, इतिहास जाणून घेण्यासाठी हा एक महत्त्वाचा चित्रपट आहे.

दरम्यान विक्की कौशलने सचिन तेंडुलकर, अजित आगरकर आणि झहीर खान यांसारख्या क्रिकेट जगतातील आयकॉन्ससाठी मुंबईत स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केली होती. यासाठी अनेक क्रिकेटर्सने उपस्थिती लावली होती. विक्की कौशल या सर्वांसोबत फोटो काढताना दिसला.