सचिन तेंडुलकर झाला डीपफेकचा शिकार; स्वत:चा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत दिली माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांपासून एकामागून एक डीपफेक व्हिडीओ समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता, मात्र आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरही या तंत्रज्ञानाचा शिकार झाला आहे. त्याने स्वत:चा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत  माहिती दिली आहे.

सध्य़ा सोशल मीडियावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका अॅपचा प्रसार करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सचिन सांगत आहे की, या दिवसात त्याची मुलगी सारा असा खेळ खेळत आहे ज्याबद्दल सगळे जणं बोलत आहेत. या खेळाचे नाव आहे स्काईड एविएटर क्वेस्ट अॅप. यामुळे ती दर दिवसाला 1 लाख 80 हजार रुपये कमावते आणि त्याला आश्चर्य होतं की या दिवसात पैसे कमावणे किती सोपे झाले आहे.

हा फेक व्हिडीओ असून या व्हिडीओत तो पुढे म्हणतो, स्काईड एविएटर अॅपचा वापर करण खूप सोपं आहे,याला कोणताही आयफोन युजर वापरु शकतो. अशात कोणत्याही व्हिडीओवर विश्वास ठेवण्यापेक्षा सावध राहा नाहीतर नुकसान होऊ शकते. हा व्हिड़ीओ पूर्णपणे फेक आहे. याला डीपफेक तंत्रज्ञानाने बनवला आहे. त्यामुळे या व्हिडीओवर बिलकुल विश्वास ठेवू नका. अन्यथा तुम्ही मोठ्या स्कॅमचा शिकार होऊ शकता. तसेच अकाऊंटही रिकामे होऊ शकते. सचिनने तो व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत लोकांना सतर्क केले आहे.