
सामना ऑनलाईन । मुंबई
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. शनिवारी सकाळी सचिन तेंडुलकर शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी पोहोचला होता. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही, त्यामुळे भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे.
देशात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उठलेला असताना सचिन तेंडुलकरने शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आला आहे. मात्र सचिन व पवारांची भेट ही पूर्वनियोजित असल्याचे सांगितले जात आहे.





























































