‘वर्ल्ड क्लास’ गोलंदाजांच्या अभावामुळे कसोटी क्रिकेटची रंगत कमी झालीय! तेंडुलकरची खंत

560

देशविदेशातील क्रिकेट शौकिनांना आता वेगवान, अटीतटीच्या आणि संतुलित खेळाची गोडी लागली आहे. त्यांना फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील तुल्यबळ झुंज पाहायला आवडते. त्यामुळेच त्यांचा अधिक ओढा कसोटीऐवजी वन डे अथवा टी-20 क्रिकेटकडे अधिक असल्याचे दिसून येतेय. कसोटी लढतीत आताशा जागतिक दर्जाचे आणि आक्रमक गोलंदाज अभावानेच दिसतात. हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे तीन बलाढय़ संघ वगळता जगातील अन्य संघांकडे कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीचा ‘जलवा’ दाखवू शकतील असे वर्ल्ड क्लास गोलंदाजच दिसत नाहीत, अशी खंत टीम इंडियाचा माजी कर्णधार ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकरने बोलून दाखवली आहे.

70 आणि 80 च्या दशकांत सुनील गावसकर विरुद्ध ऍण्डी रॉबर्टस्, डेरेक अंडरवूड, इम्रान खान आणि डेनिस लिली अशा दर्जेदार झुंजी व्हायच्या. आता तसे होत नाही असे सचिन म्हणाला.

पाटा खेळपट्टय़ांनी कसोटीचा चार्म घालवला

बहुतांश देशांनी कसोटीसाठी पाटा खेळपट्टय़ा बनविल्याने क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ बनवलाय. त्यामुळे गोलंदाजांना 5 दिवस यशासाठी छाती फुटेपर्यंत गोलंदाजी करायला लागतेय. कसोटीतील चार्म आणि रंगत निघून जायला या निर्जीव खेळपट्टय़ाच जास्त कारणीभूत आहेत असे कारकीर्दीत 200 कसोटी खेळणाऱया सचिन तेंडुलकरचे मत आहे. तो म्हणाला, कसोटी क्रिकेट जगवायचे असेल आणि पूर्वीइतकेच लोकप्रिय करायचे असेल तर सर्वच देशांनी फलंदाजधार्जिण्या पाटा खेळपट्टय़ा बनवणे थांबवायला हवे. फलंदाज आणि गोलंदाज या दोघांनाही समान संधी देणाऱया खेळपट्टय़ाच कसोटी क्रिकेटला पुन्हा गतवैभव मिळवून देऊ शकतील, असे प्रतिपादन सचिनने केले.

गिरगावच्या सेंट्रल प्लाझाशेजारी उभारलेल्या ‘प्रो फिटनेस’ व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा सिने अभिनेते सुनील शेट्टी आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या शुभहस्ते पार पडला. या सोहळय़ाचे आयोजन शिवसेना कोल्हापूर-सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शबीर मुकादम, अरुंधती दुधवडकर, हेमंत दुधवडकर, शबरेझ मुकादम यांनी केले होते. याप्रसंगी ‘आशिया श्री’ सुनीत जाधव, ‘मुंबई श्री’ श्याम रहाटे, सेलिब्रेटी ट्रेनर मनीष अडविलकर आणि शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या