सचिन करणार इंडिया लिजेंड संघाचे नेतृत्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर  10  सप्टेंबर ते  1  ऑक्टोबर 2022  या कालावधीत  कानपूरमध्ये खेळलेल्या जाणाऱया  रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या दुसऱया हंगामात  इंडियन लिजेंड्स संघाचे नेतृत्व करणार आहे. सचिनने त्यासाठी गुरुवारी संयोजकांना आपली संमती कळवली आहे.  या स्पर्धेच्या लढती  रायपूर, इंदूर आणि  डेहराडून येथे खेळवल्या जाणार आहेत. या मालिकेतील पहिली लढत कानपूरमध्ये होणार असून फायनल आणि सेमीफायनल रायपूरमध्ये खेळवल्या जाणार आहेत. या क्रिकेट सीरिजमध्ये हिंदुस्थानसह ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि इंग्लंडचे वरिष्ठ क्रिकेटपटू खेळणार आहेत. सीरिजमधील लढती टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवल्या जातील.