सदाभाऊ खोत भाजपकडून निवडणूक लढविणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी स्व. गोपीनाथ मुंढे यांच्यामुळे मिळाली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हातकणंगलेमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची संधी द्यावी. यासाठी कमळ चिन्हावर भाजपमधून लढण्याची तयारी असल्याचे रयत क्रांती संघटनेचे नेते आणि कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांच्या दूध आंदोलनावर शंका उपस्थित करण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला. दूध दरवाढीसंदर्भात चार दिवसांचे आंदोलन झाले. शासनाकडून गाईच्या दूधदरात पाच रुपयांचे अनुदान देण्यात आले, पण हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या हातात देण्याऐवजी ते दूध संस्थांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यातून शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी स्वतŠच्या फायद्यासाठी दूधउत्पादकांची घोर फसवणूक केल्याचा आरोप खासदार राजू शेट्टी यांचे थेट नाव न घेता खोत यांनी केला, तसेच याचा आपल्या संघटनेकडून पर्दाफाश करून पांढऱया दुधातील काळे बोके जनतेसमोर उघडे करणार, असेही त्यांनी सांगितले.