ट्रेलर लॉन्च होताच ‘सडक -2’चा नकोसा विक्रम, निर्मात्यांना बसला धक्का

3681

 

अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt), अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि आदित्य रॉय कपूर यांची प्रमुख भूमिका असणारा ‘सडक -2’ चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. संजय दत्त याच्या ‘सडक’ या चित्रपटाची बॅकग्राऊंड स्टोरी देखील यात घेतली आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या चित्रपटाकडे लागल्या. मात्र ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

ट्रेलर प्रदर्शित होताच काही तासांच्या आत ‘सडक -2’ने विचित्र विक्रम नावावर केला. चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. तसेच युट्युबला देखील लाईक्स पेक्षा डीसलाईक्स जास्त आल्याने निर्मात्यांना धक्का बसला असून त्यांनी नक्कीच डोक्याला हात लावला असणार.

तसेच फक्त युट्युब नाही तर ट्विटरवर देखील ‘सडक -2’ ट्रोल होत आहे. सर्वाधिक ‘नावडता’ ट्रेलर म्हणून विक्रमही केला असून ट्रोलर्स सडक -2 रोडवर आले अशी कमेंट करत आहेत. तसेच #Sadak2Trailer आनइ #BoycottSadak2 हे हॅशटॅग देखील वापरले जात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या