अर्जून आणि साराच्या ‘त्या’ अकाऊंटबाबत सचिनने केला मोठा खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा माजी खेळाडू, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने पुन्हा एकदा मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा यांच्या ट्विटर अकाऊंटबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तरुण खेळाडू अर्जुन आणि सारा यांच्या नावाने अनेक ट्विटर अकाऊंट सक्रीय आहत. हे सर्व अकाऊंट खोटे आणि बनवट असल्याचा खुसाला सचिनने केला आहे.

जवळपास 24 वर्षे क्रिकेटमध्ये एकहाती गाजवणाऱ्या सचिनचा मुलगाही उत्तम खेळाडू आहे. कमी वयात त्याने आपल्यातील चुणूक दाखवून दिली. मुंबईकडून अंडर-14, अंडर-16 आणि अंडर-19 खेळणाऱ्या अर्जुनचे पुढील लक्ष्य टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणे असून त्याच्या नावाने सोशल मीडियावर अनेक फेक अकाऊंट आहेत. यातील एका ट्विटर हँडलला टॅग करत सचिनने याबाबत खुलासा केला असून यावर कारवाईची मागणी केली आहे.

सचिनने टॅग केलेल्या ट्विटर अकाऊंटवर अर्जुन तेंडुलकर याचा फोटो लावलेला असून हे अधिकृत अकाऊंट आहे असाही उल्लेख केलेला आहे. ‘ऑफिशल, लेफ्ट आर्म मीडियम पेसर, सन ऑफ गॉड’ असा उल्लेख येथे करण्यात आलेला आहे. या ट्विटर हँडलला टॅग करून सचिनने म्हटले की, मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा यांचे कोणतेही ट्विटर अकाऊंट नसल्याचे मी येथे स्पष्ट करतो. हे (टॅग केलेले ट्विटर अकाऊंट) अकाऊंट अर्जुनला चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर व्यक्त करत आहे, तसेच बड्या व्यक्ती व संस्थांबाबत चुकीच्या पोस्ट शेअर करत आहे. या ट्विटर हँडलवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशीही मागणी सचिनने केली आहे.