
साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने 8 नोव्हेंबर 2022 रोजी खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे श्री साईबाबा समाधी मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांच्या वेळेत बदल करण्यात आला असून दुपारी 02.30 ते सायंकाळी 06.19 यावेळेत श्रींचे समोर मंत्रोच्चार होणार असल्यामुळे मंत्रोच्चार होईपर्यंत भाविकांना समाधी मंदिराचे सभामंडपापासून दर्शन सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
8 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 02.30 ते सायंकाळी 06.19 याकाळात खग्रास चंद्रग्रहण (ग्रस्तोदित) आलेले आहे. यामध्ये दुपारी 02.30 वाजता श्रींचे दर्शन बंद होईल, दुपारी 02.39 वाजता समाधी मंदिरात मंत्रोपच्चार सुरु होईल, सायंकाळी 06.19 वाजता मंत्रोपच्चार संपल्यानंतर सायंकाळी 06.30 वा. श्रींचे मंगलस्नान होईल. त्यानंतर सायंकाळी 06.45 वाजता श्रींची ‘शिरडी माझे पंढरपूर’ ही आरती होईल. सायंकाळी 07.00 वाजता श्रींची धुपारती होईल. आरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी दर्शनरांगा पूर्वीप्रमाणे सुरू होईल.
तसेच सदर ग्रहण काळात श्रींच्या समोर मंत्रोच्चार होईपर्यंत भाविकांना समाधी मंदिराचे सभामंडपापासून दर्शन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगुन सर्व साईभक्तांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन बानायत यांनी केले.





























































