साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळावर कुणाची वर्णी लागणार? राज्य सरकारकडून मंगळवारी यादी सादर होण्याची शक्यता

shirdi-trust1

दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. मंगळवारी (दि. 22) राज्य सरकारला विश्वस्त मंडळाची यादी सादर करावी लागणार आहे. त्यामुळे या विश्वस्त मंडळासह अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

शिर्डी हे देशातील दुसऱया स्थानावरील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान आहे. देश-विदेशांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा मंदिरातील विश्वस्त मंडळाची स्थापना करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिला आहे. मंगळवारी राज्य सरकारला याबाबत अहवाल सादर करावा लागणार आहे. नवीन विश्वस्त मंडळ नेमण्याच्या हालचाली सुरू होताच इच्छुकांनी विश्वस्तपदासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. दरम्यान, शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी विश्वस्त मंडळ नेमताना स्थानिकांना किमान 50 टक्के संधी देण्याची मागणी केली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या