सई लागली कामाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनच्या ब्रेकनंतर कलाकार पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले आहेत. मराठीतली आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर तब्बल 100 दिवसांनी सोमवारी सेटवर पोहोचली आहे. नुकताच एक व्हिडीओ शेयर करत सईने ही माहिती दिली आहे.

याबाबत सई म्हणाली, ’पुन्हा एकदा चित्रीकरणाला परतताना संमिश्र भावना आहेत. एकीकडे थोडीशी भीती आणि चिंता असतानाच मन खूप उत्साहित झाले आहे. सेटवर डॉक्टर, रुग्णवाहिका आहे. सेटवर आल्यावर टेंपरेचर चेक करणे, सतत हात धूणे, सॅनिटायझर बाळगणे अशा सगळ्या सावधगिरीच्या उपाययोजना बाळगल्या जातायत. लोकांना टीव्हीवरचे रिपीट एपिसोड पाहून कंटाळा आल्याने नव्या एपिसोडचे चित्रीकरण सुरू केले आहे. तेव्हा आपल्या सर्वांचा आशीर्वाद असू द्या.’ असे तिने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी बॉलीवूड चित्रपट ‘मीमी’च्या सेटवर अपघातात पाय फ्रॅक्चर झालेला असतानाही लॉकडाऊन होणार हे कळल्यावर दुखऱया पायासह सई मार्च महिन्यात रिएलिटी शोच्या चित्रीकरणासाठी पोहोचली होती. आताही लॉकडाऊन उघडल्यावर सई चित्रीकरणासाठी सेटवर पोहोचली आहे.