लॉकडाऊन काळात साईबाबाचरणी 2 कोटी 53 लाखांची ऑनलाईन देणगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटामुळे 17 मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. गेल्या 48 दिवसांच्या कालावधीत साईभक्तांकडून आॅनलाईनव्दारे साईबाबांना 2 कोटी 53 लाख 97 हजार 778 रुपये देणगी संस्थानला प्राप्त झाली असल्याची माहिती सोमवारी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

देशात व राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले. संस्थानने तत्पूर्वीच 17 मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद केले होते. साईबाबांचा महिमा व त्यांची शिकवणूक संपूर्ण जगात पोहचलेली असून त्यांचा भक्त वर्ग देशात व परदेशात मोठ्या प्रमाणात आहे. मंदिर बंदच्या काळात टाटा स्कॉय, संस्थान संकेतस्थळ व मोबाईल अ‍ॅप्सव्दारे थेट आॅनलाईन दर्शनाचा लाभ साईभक्त घर बसल्या घेत आहेत. यामध्ये टाटा स्कॉयवर सुमारे 35 लाख साईभक्त अ‍ॅक्टीवेट असून 1 लाख 12 हजार साईभक्तांनी संस्थानचे मोबाईल अ‍ॅप्स डाऊनलोड केलेले आहे. तर संकेतस्थळाला दररोज सुमारे 8 ते 9 हजार साईभक्त भेट देत आहे, अशी माहितीही डोंगरे यांनी दिली.