
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानने मुंबईतील अंधेरी परिसरात दोन कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी केली आहे. या मालमत्तेची किंमत 30.75 कोटी रुपये आहे. कनकिया वॉलस्ट्रीट बिल्डिंगमध्ये असलेल्या दोन्ही युनिट्सचे एकूण क्षेत्रफळ 5,681 चौरस फूट आहे. या कमर्शियल फ्लॅट्ससह सहा कारसाठी पार्किंगदेखील देण्यात आल्या आहेत. ही प्रॉपर्टी अमेरिकेतील औषध कंपनी एपिओर फार्मास्युटिकल्सच्या मालकीची होती.



























































