‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा! – सैफ अली खान

33874

नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची यशोगाथा सांगणारा अजय देवगणचा ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरू असून आतापर्यंत 150 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा पार करेल असे बोलले जातेय. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान चालत असताना अभिनेता सैफ अली खान याने वादग्रस्त विधान केले आहे. तान्हाजी चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवण्यात आला आहे, असा आरोप सैफ अली खान याने केला आहे.

दीपिकाचा ‘छपाक’ इंटरनेटवर लीक, निर्मात्यांना होऊ शकतं नुकसान

‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री काजोलसह सैफ अली खानचीही भूमिका आहे. सैफ अली खान याने या चित्रपटामध्ये उदयभान राठोड याची भूमिका साकारली आहे. याच अनुषंगाने अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत त्याने चित्रपटाबद्दलची आपली मते मांडली आहेत. चित्रपटातील कथा राजकारणाच्या अनुषंगाने थोड्याफार प्रमाणात बदलण्यात आली आहे. ही बाब गंभीर तसेच चुकीची आहे, असे सैफ अली खान म्हणाला.

आलिया भट्टचा ‘गंगुबाई’ अवतार, ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च

सैफ पुढे म्हणाला की, चित्रपटाचे कथानक वाचल्यानंतर उदयभान राठोड या भूमिकेच्या मी प्रेमात होतो, त्यामुळे यावर ठोस मत मांडू शकलो नाही. चित्रपटाचे चित्रिकरण सुरू असताना काही गोष्टी खटकत होत्या. भूमिका सोडायची नव्हती. त्यामुळे काहीच बोलू शकलो नाही. मात्र, पुढील वेळी योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि योग्य भूमिका घेण्याचे धाडस मी करेन, असेही त्याने सांगितले.

प्रसिद्धीच्या झोतात कलाकार सर्व गोष्टी विसरतात!
‘इंडिया’ ही संकल्पना ब्रिटिशांनी देशात रुजवली. त्याआधी ती नव्हती, असे माझे मत आहे. चित्रपटाच्या आधारे आपण कोणताही तर्क मांडू शकत नाही, असे सांगत अनेक कलाकार उदारमतवादाचा पुरस्कार करतात. मात्र, प्रसिद्धीच्या झोतात बाकी सर्व गोष्टी विसरतात, हे दुर्दैवी आहे, असा टोलाही त्याने लगावला. तान्हाजी चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवण्यात आला आहे. चित्रपटाला व्यावसायिक स्वरूप देण्याच्या नादात इतिहासाकडे कानाडोळा करण्यात आला आहे. या चित्रपटात कोणतेही ऐतिहासिक तथ्य नाही, असा दावा त्याने यावेळी केला.

आपली प्रतिक्रिया द्या