आलिया भट्टचा ‘गंगुबाई’ अवतार, ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च

1078

संजय लिला भन्साळी दिग्दर्शीत ‘गंगुबाई काठियावाडी’ या बहुचर्चित चित्रपटाचे पोस्टर मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर लॉन्च करण्यात आले. चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. बुधवारी लॉन्च करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये आलियाचा ‘गंगुबाई’ अवतार दिसत आहे.

‘उडता पंजाब’, ‘हायवे’, ‘गली बॉय’, ‘कलंक’ आणि ‘राझी’ या चित्रपटांमध्ये बहुरंगी भूमिका साकारल्यानंतर आता आलिया भट्ट ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटामध्ये एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. आलियाने आपल्या अधिकृत इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून या चित्रपटाचे दोन पोस्टर शेअर केले आहेत.

पहिल्या पोस्टरमध्ये आलिया साध्या-भोळ्या मुलीच्या रुपात एका टेबलशेजारी बसल्याचे दिसत आहे. परंतु मासून चेहऱ्याच्या या मुलीच्या शेजारी टेबलर एक बंदूक आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये आलियाचा जबरदस्त लूक दिसत आहे. हे एक ब्लॅक अँड व्हाईट पोस्टर असून यात फक्त आलियाचा चेहरा आणि चेहऱ्यावरील लाल रंगाची मोठी टिकली (कुंकू) दिसत आहे. आलियाच्या डोळ्यामध्ये प्रचंड रागही दिसतोय.

पहिले पोस्टर पाहून अनेकांना आलियाचा ‘हायवे’ चित्रपटातील लूक आठवला आहे. परंतु दुसऱ्या पोस्टरमध्ये मात्र तिने आजपर्यंत साकारलेला नाही असा लूक दिसत आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’ यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. यात आलिया माफिया क्वीनची भूमिका साकारणार आहे. 11 सप्टेंबर, 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च झाल्यानंतर अभिनेता रणवीर कपूर, दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि जॅकलिन फर्नांडिससह अन्य कलाकारांनी आलियाच्या पोस्टवर कमेंट केली आहे.

ranveer shraddha

आपली प्रतिक्रिया द्या