हिंदुस्थानात सुरक्षित वाटत नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वारंवार ठार मारण्याच्या धमक्यांमुळे हिंदुस्थानात मी मुंबई पोलिसांच्या सुरक्षा रक्षकांच्या गराडय़ात असतो आणि त्यांनी दिलेली गाईडलाईन फॉलो करतो. घराबाहेर पडल्यानंतर तर मला जास्त काळजी घ्यावी लागते. इथे दुबईत मी जास्त सुरक्षित आहे, पण हिंदुस्थानात थोडा प्रॉब्लेम आहे, असे वादग्रस्त विधान अभिनेता सलमान खान याने दुबईत एका मुलाखतीवेळी केले.

हिंदुस्थानसह जगभरात कोटय़वधी चाहते असलेल्या सलमान खान याला काही वर्षांपासून लॉरेन्स बिष्णोई गँगकडून ठार मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर, त्याला मुंबई पोलिसांची वाय पॅटेगरीची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. त्यात आता भर पडली असून दोघा अज्ञात व्यक्तींनी मार्च आणि एप्रिल महिन्यात त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात मूळचा राजस्थानी, पण कामानिमित्ताने मुंबईत आलेल्या एका अल्पवयीन मुलाने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पह्न करून सलमान खानला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्याला नुकतीच अटक करण्यात आली आहे. वारंवार येणाऱया या धमक्यांमुळे सलमानला आता हिंदुस्थानात सुरक्षित वाटत नाही.