टाटा रुग्णालयासाठी सलमानच्या सर्वात आवडत्या जॅकेटचा लिलाव

टाटा रुग्णालयातील कर्करुग्णांच्या मदतीसाठी अभिनेता सलमान खान याने आणखी एक पाऊल उचलले आहे. सलमानच्या सर्वात आवडत्या जॅकेटचा लिलाव टाटा रुग्णालयात केला जाणार असून त्यातून मिळणारा निधी रुग्णालयासाठी दिला जाणार आहे.

सलमान खान ‘लॉट्स ऑफ लव्ह अॅण्ड रिस्पेक्ट… गॉड ब्लेस’ असे हृदयस्पर्शी शब्द असलेल्या या जॅकेटवर सलमानची स्वाक्षरीही आहे. रुग्णालयात एका विशेष लिलावात ते ठेवले जाणार आहे. त्या जॅकेटच्या विक्रीतून मिळणारी सर्व रक्कम रुग्णालयातील वैद्यकीय सेवा आणि संशोधनासाठी दिली जाणार आहे. बिइंग ह्यूमन-द सलमान खान फाऊंडेशन या सलमानच्या संस्थेकडून गरीब रुग्णांना आर्थिक मदत केली जाते.