
भारतीय वंशांचे ब्रिटिश-अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून डॉक्टरांनी त्यांचे व्हेंटिलेटर काढले असून आता ते बोलूही लागले आहेत. रश्दी यांच्यावर शुक्रवारी माथेफिरू तरुणाने केलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते, मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
न्यूयॉर्क शहरात शुक्रवारी एक कार्यक्रमादरम्यान रश्दी यांच्यावर 24 वर्षांच्या हादी मातर याने चाकूने हल्ला केला. त्याने रश्दी यांच्या मान आणि पोटावर तब्बल 10 ते 15 चाकूचे वार केले. रश्दी यांना तातडीने एअर लिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या मान आणि पोटावर तातडीने शस्त्रक्रिया केली. दरम्यान, मी निर्दोष आहे, असा दावा शियापंथीय हल्लेखोर मातर याने न्यायालयासमोर केला आहे.




























































