सलून, ब्युटी पार्लर सेवेला अपॉइंटमेंट बंधनकारक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारने 28 जूनपासून सलून सुरू करायला परवानगी दिल्यामुळे या ठिकाणी गर्दी आणि कोरोनाचा धोका टाळण्यासाठी पालिकेने कठोर नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये सलून-ब्युटी पार्लरमध्ये अपॉइंटमेंट बंधनकारक करण्यात आली आहे. शिवाय या ठिकाणी केवळ केस कापणे, डाईंग, वॅक्सिंगसाठीच परवानगी असेल त्वचेसंदर्भात कोणतीही सेवा दिली जाणार नाही. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याबाबत परिपत्रक काढून नियमावली जाहीर केली आहे.

n सध्या परवानगी मिळालेल्याच सुविधा मिळतील असा ठळक सूचना सलून-ब्युटी पार्लरबाहेर लावाव्या लागतील.
n सेवा देणाऱया कर्मचाऱयांना हॅण्ड ग्लोक्हज, ऍप्रॉन आणि मास्क कापरणे बंधनकारक असेल.
n प्रत्येक गिऱहाईकाला सेवा दिल्यानंतर खुर्ची सॅनिटाइझ करावी लागेल.
n दर दोन तासांनी सेवेचे संपूर्ण ठिकाण निर्जंतूक करावा लागेल. शक्यतो डिस्पोजल टॉवेल्स, नॅपकिन वापरावे अन्यथा प्रत्येक सेवेनंतर सॅनिटायझेशन करावे लागेल.
n एसी न लावता हका खेळती राहील याची काळजी घेऊनच सेवाद्यावी लागेल.
n नियम मोडून काम करीत असल्याचे आढळल्यास साथरोग कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.