
मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसाचा वाद वाढत असल्याचं चित्र आहे. त्यात अलिगढ येथील सपाच्या महिला नेत्याने मंदिरासमोर बसून लाउडस्पीकरवर कुराण पठण करू, असं वादग्रस्त विधान केलं आहे.
या नेत्याचं नाव रुबीना खानम असं आहे. अलिगढ येथील हिंदुत्ववादी संघटनांनी 21 चौकांमध्ये लाउडस्पीकरवर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर खानम यांनी हे विधान केलं आहे.
त्या म्हणाल्या की, मुस्लिमांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नये. जर मशिदींसमोर हनुमान चालीसा वाचली गेली तर आम्हालाही मंदिरांसमोर बसून लाउडस्पीकरवर कुराणाचं पठण करावं लागेल. आणि त्यात आम्ही महिला आघाडीवर असू, असं वादग्रस्त वक्तव्य खानम यांनी केलं आहे.
मैं यह बताना चाहूंगी कि मुस्लिम समुदाय को छेड़ने की कोशिश न की जाए, अगर ऐसा हुआ तो हम महिलाएं मोर्चा संभालेंगी और तुम्हारे मंदिरों के आगे बैठकर अपने कुरान का पाठ करेंगी: रूबीना खानम, समाजवादी पार्टी,अलीगढ़, उत्तर प्रदेश pic.twitter.com/PKO7H3jF5d
— ANI_HindiNews (@AHindinews) April 18, 2022
रमजानचा पवित्र महिना सुरू असताना आम्हाला आमच्या धार्मिक परंपरांचं पालन रू द्या. त्यात ज्याप्रकारे अडचणी निर्माण केल्या जात आहेत. ते चुकीचं आहे. जर मुस्लिमांना लक्ष्य करून मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा प्रयत्न केला तर शेकडो महिला याविरुद्ध आंदोलन करतील, अशी धमकीही खानम यांनी दिली आहे.
भाजपचं सरकार मुसलमान आणि हिंदुंना आपसात भांडण करण्यासाठी उद्युक्त करत आहे. हे तेच सरकार आहे, जे स्वतःच्या श्रद्धा, आचरण यांना विसरलं आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

























































