संभाजीनगरात कोरोनाचा 35 वा बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगर शहरात आणखी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बळींची संख्या आता 35 वर पोहोचली आहे.

बहिमायतबाग, हिमायतनगर येथील 65 वर्षीय रुग्णाला 17 मे रोजी घाटी रुग्णालयात संदर्भित करण्यात आले होते. त्याचवेळी त्याच स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. तो 18 रोजी सकाळी पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यानंतर त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरू करण्यात आले होते. दरम्यान त्याच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत गेले. या रुग्णावर यापूर्वी बायपासची शस्त्रक्रिया झालेली होती. तसेच त्याला उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे आजारही होते. त्यामुळे त्याच्याकडून उपचारास फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे मंगळवारी पहाटे एकच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती घाटीच्या सूत्रांनी दिली.