मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। संभाजीनगर

संभाजीनगरमधील गरवारे स्टेडीयमजवळ उभ्या असलेल्या एका मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. ट्रकवरील कंटेनरमध्ये कार होत्या. दरम्यान, आगीचे वृत्त समजताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.या आगीत कोणीही जखमी व मृत झाल्याचे वृत्त नाही.