गाण्यात ईश्वर साकारतो! – समीर साप्तीसकर

63

समीर साप्तीसकरसंगीतालाच तो दैवत मानतो. कारण संगीतामुळे त्याला आनंद मिळतो. समाधान मिळते.

> आपलं आवडतं दैवत? – ‘संगीत’ हेच माझं दैवत. कारण  ते मला अनपेक्षितरीत्या काहीतरी देऊनच जातं.

> कलेचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं? – संगीताची किंमत होऊ शकत नाही. तसेच देवाच्या बाबतीत आहे. त्याला आपण विकत घेऊ शकत नाही. संगीत देव आणि आपल्याला जोडून ठेवतं.

> संकटात या कलेची तुला कशी मदत होते, असं वाटतं?- बऱयाचदा असं होतं की, जेव्हा मी निराश असतो. तेव्हा गिटारवर एखादा राग वाजवतो. तेव्हा खूप मानसिक शांतता मिळते.

> संगीत आणि भक्तीची सांगड कशी घालतोस? – संगीतातली रागांची स्पंदन देवाला अनुभवण्यासाठी मदत करतात. संगीत आणि कलेची सांगड घालाणारा कलाकार असतो.

> संगीत कला साकारण्याकरिता त्याची कशी मदत होते? – जेव्हा गाणं करतो, तेव्हा माझ्यासमोर दिसेल तो देव माझा मानतो.        

> संगीताला प्रार्थना केल्यावर यश मिळालंय, असा प्रसंग?- सुरुवातीच्या काळात मी संगीत करायचो, पण तेव्हा काय मिळतंय हे कळत नव्हतं. तरीही मी माझे प्रयत्न करत होतो. पण यातून मला समाधान मिळायचं. आतापर्यंत देवाकडे मी काहीही मागितलं नाही.

> त्याच्यावर रागावता का? – नाही. मी स्वतःवर रागावतो, कारण मला ती ज्या पद्धतीने वापरता यायला हवी तशी येत नाही.

> कलेमुळे लाड कसे पुरवतोस? – मला वाद्ये विकत घ्यायला खूप आवडतात. हेच लाड समजतो.

> कलेकडे काय मागशील? – चांगलं संगीत करता यावं, अशी बुद्धी मी देवाकडे मागतो. संपूर्ण जगाला एक तरी चांगलं गाणं देता यावं जेणेकरून जग माझ्यावर खूश होईल.

> संगीताची नियमित उपासना कशी करतोस?- रोज संध्याकाळी सातनंतर तीन ते चार तास रियाज करतो.

आपली प्रतिक्रिया द्या