
सॅमसंग कंपनीचा Galaxy Wide5 हा स्मार्टफोन लवकरच हिंदुस्थानात लॉन्च होणार आहे. या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 6 GB चा रॅम देण्यात येणार आहे.
29 सप्टेंबर रोजी हा फोन हिंदुस्थानात लॉन्च होणार आहे. हा फोन कॅमेरा प्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. कारण फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये लेटेस्ट अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 11 असणार आहे. तसेच मीडियाटेक डायमेनसिटी 700 प्रोसेसरही असणार आहे. तसेच 6 GBचा रॅम आणि 128 GB इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे.
फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असून 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरही देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5 G असून बॅटरीची क्षमता 5 हजार MAh इतकी असणार आहे. या फोनची किंमत अद्याप समोर आलेली नाही.































































