बीडमध्ये गोदा पट्ट्यात झाडाझडती  मोठा वाळू साठा जप्त 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीडच्या गेवराई तालुक्‍यात वाळूतस्करांनी गोदावरी नदीच्या पात्रात वाळू तस्करी सुरू ठेवली होती. याची माहिती तालुक्यातील महसूल  प्रशासनाला असतानाही बेसुमार वाळू उपसा सुरूच होता. बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी दुपारी तालुक्यातील गुंतेगाव येथे मोठा वाळू साठा जप्त केला आहे.

संपूर्ण प्रशासन कोरोना विरुद्ध लढत असताना प्रशासन आपल्या कामात व्यग्र होते. मात्र वाळूतस्करांनी गोदावरी पट्टयातुन बेसुमार वाळू उपसा सुरूच ठेवला होता. अखेर मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी राहुल रेखावार व अन्न अधिकाऱ्यांचा ताफा गोदावरी नदीच्या वाळू पट्ट्यात पोहोचला. हा मोठा वाळू साठा प्रशासनाने जप्त केला असून रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.