राणेंचे कट्टर विरोधक संदेश पारकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

4610

राज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने प्रचाराला जोर वाढला आहे. बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणकवली येथे जाहीर सभा घेतली. यावेळी नारायण राणे यांचे कट्टर विरोधक भाजप नेते संदेश पारकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी कणकणवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सतिश सावंत आणि कुडाळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ ऐतिहासिक प्रचा सभा घेतली. या सभेत संदेश पारकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. संदेश पारकर हे नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.

कणकवलीत उद्धव ठाकरेंची ऐतिहासिक सभा, वाचा भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

राज्यात महायुती असतानाही भाजपने कणकवली येथे आपला उमेदवार दिला आहे. याविरोधात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बंडाची भूमिका घेतली. यानंतर पक्षाच्या विचारांविरोधात काम करणारे संदेश पारकर, अतुल रावराणे, लक्ष्मण रावराणे, संदेश पटेल यांच्यासह सहा जणांची सहा वर्षांसाठी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली. सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या