आयशर टेम्पो-कंटेनरच्या अपघातात भाजी व्यापाऱ्याचा मृत्यू

914

पुणे-बेंगलोर महामार्गावर आयशर टेम्पो व कंटेनरच्या अपघातात मूळचे संगमेश्वर येथील मात्र चिपळुणात भाजीचा व्यापार करणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर चालकासह दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेने चिपळुणातील भाजी व्यापा-यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

प्रशांत जगन्नाथ पवार (सध्या रा. चिपळूण, मूळचा रा. संगमेश्वर, ओझरखोल) असे या भाजी व्यापा-याचे नाव आहे. प्रशांत पवार हे भेगाळे येथे काही वर्षे भाजी व्यवसाय करीत होते. भाजीचा माल आणण्यासाठी ते पुणे गुलटेकडी भाजी मार्केटमध्ये नेहमी जात असत. त्याप्रमाणे ते मंगळवारी रात्री चिपळुणातून आयशर टेम्पोने आपला चालक किशोर कांबळे (रा. खेंड बावशेवाडी, चिपळूण) सहकारी अभिषेक किशोर जागुष्टे यांच्यासह पुणेच्या दिशेने चालले होते. खेड शिवापूर टोलनाका अलिकडे आयशर टेम्पो आला असता यावेळी आयशर टेम्पो व कंटेनरची धडक बसली. या अपघातात भाजी व्यापारी प्रशांत पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अभिषेक व किशोर जखमी झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या