संगमनेर तालुक्यात भरदुपारी भीषण दरोडा; वृद्धेचा निर्घृण खून

लुटीच्या उद्देशाने दरोडेखोरांनी भरदुपारी घरात घुसून गळा दाबून एका वृद्ध महिलेचा खून केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर गावात दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहेया घटनेत दरोडेखोरांनी चार वर्षीय मुलीच्या कानातील सोन्याच्या रिंगा ओरबडल्याने ती जखमी झाली आहेया मुलीने आरडाओरड केल्यानंतर सदरचा प्रकार लक्षात आलात्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतलीमात्रतोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होतेघटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली असूनश्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहेपोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनीही तातडीने कौठेकमळेश्वर गाठले असूनदरोडेखोरांचा माग काढण्यासाठी शर्थ केली जात आहे.

सावित्राबाई मोगल शेळके (वय 60) असे मृत वृद्धेचे नाव असूनईश्वरी सोमनाथ भडांगे (वय 4) असे जखमी बालिकेचे नाव आहे.

कौठेकमळेश्वर गावाच्या सुरुवातीलाच असलेल्या एका घरात सावित्राबाई शेळके ही महिला एकटीच राहातेघरातच तिचे छोटेखानी गोळ्याबिस्किटांचे दुकान आहेया महिलेला एकुलती एक मुलगी असूनती अंभोरे येथे दिलेली आहेआज दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान सदर महिला घरात एकटीच असल्याची संधी साधून दरोडेखोरांनी तिच्या घरात प्रवेश केलायावेळी तिने प्रतिकार करीत आरडाओरड करू नये म्हणून दरोडेखोरांनी तिचा गळा दाबून तिच्या गळ्यातील सर्व दागिने व कानातले ओरबाडून घेतलेमात्रया प्रकारात श्वास गुदमरून त्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.

हा प्रकार सुरू असतानाच त्या वृद्धेच्या घरापासून काही अंतरावर राहणारी ईश्वरी खाऊ आणण्यासाठी त्या महिलेच्या दुकानात गेलीदरोडेखोरांची नजर त्या लहानशा मुलीच्या कानातील सोन्याच्या डूलवर पडलीत्यांनी ते डूल कानासह ओरबाडलेत्यामुळे ईश्वरी रडत रडत तेथून पळतच आपल्या घरी परतलीतिची अवस्था पाहून तिच्या आईवडिलांनी काय झाले म्हणून विचारले असता ती फक्त… आजी…’ असे म्हणू लागल्याने त्या परिसरातील काहींनी शेळके यांच्या घरी जाऊन पाहिले असता शेळके यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती समजताच गावकऱयांनी दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी अख्खा परिसर पिंजून काढलामात्रदरोडेखोरांचा कोठेही पत्ता लागला नाहीसंगमनेरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल मदनेतालुका पोलीस निरीक्षक पांडुरंग पवारशहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आदीसह तालुका व शहर पोलिसांनी कौठेकमळेश्वरकडे धाव घेतलीसध्या घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱयांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही उपस्थित आहे.

आपली प्रतिक्रिया द्या