सहजीवनी या… संगीता गावडे

प्रामाणिक जोडीदार

> आपला जोडीदार सुभाष रामचंद्र गावडे

> लग्नाचा वाढदिवस – ७ मार्च १९८८

> त्यांचे दोन शब्दात कौतुक समजूतदार, कलाप्रेमी

> त्यांचा आवडता पदार्थ कढी भजी

> स्वभावाचे वैशिष्टय़ कष्टाळू आणि प्रामाणिक.

> एखादा त्यांच्याच हातचा पदार्थ थाली पीठ छान करतात.

> आठवणीतला क्षण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उत्कृष्ट व्यंगचित्रकाराचा पुरस्कार मिळाला तो क्षण.

> वैतागतात तेव्हा मी शांत राहून दुर्लक्ष करते.

> त्यांच्यातली कला ते स्वतः व्यंगचित्रकार- रांगोळीकार आहेत त्याचबरोबर ते वर्तमानपत्रातून पत्रलेखन, कविता लिहितात.

> त्यांच्यासाठी एखादी गाण्याची ओळ फिरुनी नवे जन्मेन मी..

> तुम्हाला जोडणारा भावबंध आमची तिन्ही मुलं.

> आयुष्यात सांगायची राहिलेली गोष्ट सरकारी घरात राहतो. सेवानिवृत्तीनंतर आमचे कसे होणार असा सतत मनात विचार यायचा. पण त्यांनी माझ्या मनातील घालमेल ओळखली होती आणि त्यांनी थेडे थोडे पैसे जमा करुन घर घेऊन दाखवले. खरंच त्यांची मनापासून मी आभारी आहे. अशीच तुमची साथ कायम लाभूदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आपला जोडीदारत्याची अनेक वर्षांची मोलाची साथ. अनेक गोड, तिखट आठवणींना उजाळा देणारंआणि पतीपत्नी या नात्यातील भावबंध दृढ करणारं सदरआपणही आपल्या जगण्यातील मान्यवरच असतो. तेव्हा जोडीदाराविषयीच्या नाजूक भावना मांडा छायाचित्रासहित या सदरामध्येया प्रश्नांच्या चौकटीतसुंदर, तरल भावनांना प्रसिद्धी दिली जाईल.

आमचा पत्ता ः आनंदाचं झाड, शेवटचे पान, दै. ‘सामना’, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामनामार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025 किंवा backspage18@gmai>.com या ईमेलवरही पाठवता येईल.