
सांगली जिल्ह्यात आज नव्याने 399 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधिताची एकूण संख्या 11,396 इतकी झाली आहे. दरम्यान आज 19 रुग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 465 झाली आहे.
सांगली जिल्ह्यात अलीकडच्या काही काळात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे तर मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. आज नव्याने आढळलेल्या 399 रुग्णांमध्ये सांगली महापालिका क्षेत्रात 109, सांगली शहर 65 आणि मिरज शहरात 44 रुग्ण आढळून आले. दरम्यान आज 19जणांचा मृत्यू झाला त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या 465 झाली आहे.
सांगली जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11396 अशी एकूण रुग्ण संख्या झाली आहे. 6981 रुग्ण बरे झाले आहेत तर सध्या 3950 रुग्णावर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत.



























































