
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का देत अवघ्या 16 जागांवर रोखण्यात महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. सर्वाधिक 18 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस नंबर वन पक्ष ठरला. शिवसेना जिल्हाप्रमुख अभिजीत पाटील हे चिकुर्डे गटातून विजयी झाले. तर काँग्रेस पक्षाने 11 जागा जिंकल्या आहेत. जिल्ह्यातील दहा पंचायत समिती पैकी काँग्रेस, राष्ट्रवादी, अजित पवार गट, शिंदे गट या पक्षांना प्रत्येकी दोन पंचायत समितीची सत्ता मिळाली.
राष्ट्रवादीने 18 जागा मिळवून जिल्हा परिषदेतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेस 11 उमेदवार विजय झाले आहेत. कडेगाव, पलूसमध्ये पक्षाला मोठे यश मिळाले आहे. अजित पवार गटाला शिराळा तालुक्यात तीन, मिरज दोन, तासगाव दोन जागा, तर आटपाडी, जत तालुक्यातून प्रत्येक जनसुराज्य, रयत क्रांती आघाडीने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला आहे. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. अवघ्या एका जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे मात्र अजित पवार गटाने सहा जागा जिंकल्या आहेत. वेळप्रसंगी अजित पवार गट महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करेल, अशी चर्चा आहे.































































