सांगलीत सकल मराठा समाजाचा विराट मोर्चा, लाखोंचा जनसागर रस्त्यावर; संयम अन् शिस्तीचे दर्शन

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी, तसेच जालना येथे आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीत आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी लाखोंचा जनसागर शांततेत रस्त्यावर उतरला होता. मोर्चात जिह्यातील गावागावांतून लाखो मराठा बांधव सहभागी झाले होते. आता आरक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नसल्याचा निर्धार मोर्चाद्वारे करण्यात आला. सरकारने ‘गांधारी’ची भूमिका घेऊ नये. वेळ पडल्यास सरकारच्या छाताडावर भगवे झेंडे लावू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

आज सकाळी विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्या हस्ते क्रांतिज्योत प्रज्वलित करून मोर्चाला सुरुवात झाली. मराठा आरक्षणाच्या लढय़ासाठी या मोर्चात मोठय़ा संख्येने मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. मोर्चाचे एक टोक पुष्पराज चौक येथे, तर दुसरे टोक राममंदिर चौकात होते. टिळक चौकापर्यंतचे रस्ते गर्दीने भरले होते. या मोर्चामध्ये मुली व महिलांची संख्या लक्षणीय होती. सकाळी साडेअकरा वाजता विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा मोर्चेकऱयांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. मोर्चेकरी एकदम शिस्तीने चालत होते.मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मुला-मुलींच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना दिले.

 नांदेडमध्ये ‘गिरीश महाजन, चले जाव’च्या घोषणा

मराठकाडा मुक्तिसंग्राम दिनाचे ध्कजारोहण लोकप्रतिनिधींच्या हस्ते न करता जिल्हा प्रशासनाने कराके, अशी मागणी करत पालकमंत्र्यांनी झेंडावंदनास येऊ नये, असे आवाहन सकल मराठा समाजाने केले होते. तरीही पालकमंत्री गिरीश महाजन ध्वजारोहणास आल्यामुळे त्यांना काळे झेंडे दाखकून पालकमंत्री चले जावची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.