मिरजमध्ये शंभर वर्ष जुन्या हनुमान मुर्तीची मानसिक संतुलन बिघडलेल्या महिलेकडून विटंबना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगलीतील मिरज येथील शंभर वर्ष जुन्या हनुमान मुर्तीची विटंबना करण्यात आली आहे. ही विटंबना मानसिक संतुलन बिघडलेल्या महिलेकडून करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले आहे.  त्यामुळे परिसरातील तणावपूर्ण परिस्थिती निवळली आहे.

 नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता बाळगावी असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी केले आहे.