
शनिवारी सायंकाळी मिरजवरुन प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यात 22 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. यात 12 जण संगमेश्वर तालुक्यातील आहेत. संगमेश्वर तालुक्यातील रुग्णसंख्या आता 51 वर गेली असून जिल्ह्यात याबाबतीत तालुका एक नंबरवर आहे.
शनिवारी सापडलेल्या 12 पैकी तब्बल 10 जण हे साखरपा परिसरातील निनावे, दख्खन, भोवडे, भडकंबा भागातील आहेत. तर एक जण फुणगुस आणि एक जण कोंड उमरेतील आहे. दरम्यान, याबाबतीत घेतलेल्या माहितीनुसार साखरपा भागातील पॉझिटिव्ह रुग्ण एका खासगी ट्रॅव्हल्स मधून आले असून कंटेंटमेंट झोन मधून कोणतीही तपासणी न करता हे प्रवासी तालुक्यात येतातच कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

































































