खोताची वाडी येथे  श्री साईदत्त क्रीडा मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त सफाई कर्मचाऱयांचा सत्कार  

गिरगावच्या खोताची वाडीमधील श्री साईदत्त क्रीडा मंडळाच्या वतीने मंगळवारी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. मुंबई महापालिकेचे गिरगाव सफाई विभागीय कनिष्ठ अधिवेशक रवींद्र गवळी यांनी ध्वजारोहण केले. यावेळी माजी नगरसेविका मीनल जुवाटकर, पंढरपूर जिल्हा संपर्कप्रमुख दिवाकर भटकळ, योगा स्पाच्या संचालिका सुहासिनी जागुष्टे, मंडळाचे अध्यक्ष दिनेश सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दिवाकर भटकळ आणि मंडळाचे सचिव राजन मुरांजन यांच्या हस्ते सफाई कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला.