संजय दत्तची कर्करोगावर मात! लवकरच पुन्हा दिसणार चित्रपट सेटवर

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला कर्करोग असल्याची बातमी कळताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. मात्र आता त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. संजय दत्त याने कर्करोगावर मात केली आहे. ऑगस्टमध्ये संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे वृत्त समोर आले होते. संजय दत्तचा जवळचा मित्र राज बंसल यांनी संजयची प्रकृती आता ठीक असल्याचे सांगून तो पूर्णपणे कर्करोगमुक्त झाल्याचे सांगितले आहे.

संजय बद्दल माहिती देताना बंसल यांनी सांगितलं की, ‘सोमवारी संजय पीईटी स्कॅनसाठी कोकिला बेन रुग्णालयात गेला होता. या तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला सांगितले की आता तो कर्करोगमुक्त झाला आहे.’ दरम्यान, श्वासोच्छ्कास घेण्यास त्रास होत असल्याने संजय दत्तला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेथे त्याला फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. यानंतर उपचारासाठी तो अमेरिकेला गेला होता.

आपली प्रतिक्रिया द्या